Skip links

म मॅरेथॉन चा म मॅरेथॉन चा

म - 'मॅरेथॉन' चा

लेखक : डॉ. संदीप सूर्यकांत काटे

प्रकाशक : दीपस्तंभ प्रकाशन

मॅरेथॉन विषयावरील मराठी भाषेतील "म मॅरेथॉन चा" (M for Marathon) हे जगातील पहिलेच पुस्तक आहे. मॅरेथॉन धावपटू असो अथवा मॅरेथॉन आयोजक, दोन्हींसाठी हे एका उत्तम मार्गदर्शकाचे काम करते.

मुंबईतील पोलिस लायनीत लहानाचा मोठा झालेला एक लाजरा बुजरा 'चसमिस' मुलगा पुढे जाऊन प्रथितयश सर्जन व प्रसिद्ध मूळव्याधी तज्ञ झाला. वयाच्या पस्तिशीत योगायोगाने त्याच्या आयुष्यात 'मॅरेथॉन' आली. स्वतः मॅरेथॉनमध्ये पळताना आपल्याही गावात मॅरेथॉन भरवायची अशी सहज मनात आलेली कल्पना मित्रांच्या साथीने वास्तवात उतरवली आणि त्यातून जगप्रसिद्ध ' सातारा हिल हाफ मॅरेथॉन 'चा जन्म झाला.

'म - मूळव्याधी' तून 'म - मॅरेथॉन' कडे झालेल्या या भन्नाट प्रवासात कालांतराने 'म - मातीतल्या खेळांच्या' रूपाने आणखी एक नवा अध्याय आला. आता 'म - मनोबल' परिवाराशी जोडल्या गेलेल्या डॉ. संदीप सूर्यकांत काटे यांच्या आयुष्याची ही काहीशी आश्चर्यकारक कहाणी तुम्हालाही तुमच्या जीवनात काहीतरी तुफानी करण्याची प्रेरणा देईल, नवी उमेद देईल अशी आशाच नव्हे तर खात्री वाटते!

यजुवेंद्र महाजन,
दीपस्तंभ - मनोबल फाऊंडेशन

ठळक वैशिष्ट्ये.

सुंदर स्केचेस आणि लेखनाची अनोखी पद्धत, यासह अष्टपैलू मार्गदर्शक असण्यापलीकडे डॉ. संदीप यांनी हे पुस्तक वाचायला मनोरंजक बनवण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. काही ठळक वैशिष्ट्ये इथे नमूद केली आहेत.

पहिले पुस्तक

"म - मॅरेथॉन चा" हे मॅरेथॉनिंग आणि रनिंग या विषयावरील मराठी भाषेतील पहिले पुस्तक आहे.

सर्वांसाठी मार्गदर्शक

मॅरेथॉन बाबतच्या मूलभूत व प्रगत अशा दोन्ही प्रकारच्या संकल्पना सर्व धावपटूंसाठी सोप्या भाषेत व मनोरंजक शैलीत मांडल्या आहेत.

संवादशैली

पुस्तकाची संवादशैली वाचून डॉ. संदीप तुमच्याशी गप्पांच्या माध्यमातून जीवन प्रवास उलगडून सांगत आहेत, असेच जाणवते.

सुंदर कलाकृती

लेखकाच्या अनुभवातील अनेक प्रसंग तसेच वेगवेगळ्या संकल्पना दर्शवण्यासाठी पुस्तकात ठिकठिकाणी सुंदर स्केचेसचा वापर करण्यात आला आहे (कलाकार : अमित आर्टिस्ट)

क्यू-आर कोड

या पुस्तकात ठिकठिकाणी काही उपयुक्त व मनोरंजक माहिती देण्याकरिता संबंधित संकेतस्थळ अथवा विडिओ इत्यादींचे लिंक्स असलेले QR कोड दिलेले आहेत.

योगदान

या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या 'मनोबल' प्रकल्पाला जाते, जे अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या मोफत उच्च शिक्षणासाठी कार्यरत आहेत.

३८०+
उत्तम दर्जाची पाने
६०+
सुंदर कलाकृती

भाषाशैली

%

सर्जनशीलता

%

संपादन

%
मनोबल प्रकल्प

अपंग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी कार्यरत.

मनोबल ही अपंग व्यक्ती, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली निवासी संस्था आहे, जी या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी देखील मदत करते आणि प्रवेशयोग्य आणि सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. दीपस्तंभ फौंडेशन च्या “मनोबल” या प्रकल्पाद्वारे या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात.

“म – मॅरेथॉन चा” या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या या ‘मनोबल’ प्रकल्पाला जाते.

वाचकांच्या प्रतिक्रिया

"म - मॅरेथॉन चा" च्या सर्व वाचकांचे मौल्यवान अभिप्राय आणि प्रतिक्रिया शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. या पुस्तकाच्या विक्रीतून विक्रीतून मिळालेली १००% रक्कम दान करण्यात आली आहे.

हे पुस्तक न पळणाऱ्याला पळवणार! पळणाऱ्यांना अजून जोरात पळवणार!!