Skip links
प्रेरणादायी प्रवास

Customers reviews

वाचकांच्या प्रतिक्रिया

सध्या ‘मॅरेथॉन’ हा शब्द बऱ्यापैकी कानावर पडतो. पण याबाबत अनेक समज-गैरसमजही प्रचलित आहेत. धावणे हा कमीत कमी साधनांमध्ये अगदी सहज करता येईल, असा व्यायामप्रकार. अगदी अनवाणीही धावता येतं. विस्मृतीत निघालेल्या धावण्याचं पुन्हा स्मरण करून आपल्या आरोग्यदायी आणि संपन्न जीवनाचा भाग बनवण्याच्या हेतूनं मॅरेथॉनचा जगभर प्रसार होतो आहे. मॅरेथॉन म्हणजे ४२.१९५ किलोमीटर इतकं अंतर ठराविक वेळेत धावून पूर्ण करणं.

“म-‘मॅरेथॉन’ चा” हे सातारा येथील डॉ. संदीप काटे यांचं पुस्तक या विषयावरील मराठीतलं बहुधा पहिलंच पुस्तक असावं. वैद्यकीय पेशातील या अवलियानं वयाच्या ३७व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. त्यानंतर २०१२ ते २०२० या काळात देश-विदेशातील अनेक मॅरेथॉन पूर्ण केल्या. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत कठीण अशी ८९ किमी ‘कॉम्रेडस’ ही अल्ट्रा-मॅरेथॉन तीनदा पूर्ण केली.

दरम्यानच्या काळात त्यांनी आपली पत्नी डॉ. सुचित्रा काटे यांनाही धावण्याचं वेड लावलं. त्यांनीही काही मॅरेथॉनबरोबरच ऑक्टोबर २०१९मध्ये गोव्यातील ट्रायथॅलॉन अर्थातच अर्ध-आर्यनमॅन (९० किमी सायकलिंग, १.९ किमी पोहणे व २१.१ किमी धावणे) ही स्पर्धा पूर्ण केली.

याच दरम्यान डॉ. काटे दाम्प्त्यानं आपापल्या मित्रमैत्रिणींनाही हे व्यसन लावलं. त्यांच्या माध्यमातून सातारकरांमध्ये हे सकारात्मक व्यसन हळूहळू वाढत आहे. या धावण्याच्या सार्वजनिक चळवळीची मुहूर्तमेढ डॉ. काटे यांनी ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’च्या रूपानं २०१२मध्ये रोवली. शिस्तबद्ध व नेटकं नियोजन, सुंदर वातावरण, सातारा-कास असा यवतेश्वर घाटातून जाणारा अवघड मार्ग आणि पावसाची हजेरी, या गोष्टींनी अगदी पहिल्याच स्पर्धेपासून ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’ अतिशय लोकप्रिय अर्धमॅरेथॉन म्हणून नावलौकिकास आली. ‘रनर्स वल्ड’ या जगप्रसिद्ध मासिकानं ‘सातारा हिल्स हाफ मॅरेथॉन’ला आपल्या मुखपृष्ठावर प्रसिद्धी देऊन सन्मान केला. पुढे त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ड रिकॉर्डस्’मध्येही नोंद झाली.

पुढे वाचा…

अरविंद जाधव,

अक्षरनामा

मॅरेथान म्हणजे जणू माणसाच्या अदम्य जिद्दीचा, अखंड प्रयत्नाचा, अविरत परिश्रमाचा समानार्थी शब्द. मॅरेथान म्हणजेच सततचा सराव, सरावातलं सातत्य अन् सातत्यातली सार्थकता.

सातारकरांसाठी मॅरेथाॅन हा शब्द आता नवा राहिलेला नाही. किंबहुना सातारा अन् मॅरेथाॅन हे समीकरणच आता दृढ बनलं आहे. ‘हिल हाफ मॅरेथाॅन’नं साताऱ्याचं नावही सातासमुद्रापार पोचवलं आहे. साताऱ्याच्या मातीत मॅरेथाॅनची चळवळ आता चांगलीच रूजली आहे. त्यातलंच एक अग्रगण्य नाव अर्थातच डाॅ. संदीप काटे.

डाॅ. संदीप काटे हे साताऱ्यातील आघाडीचे वैद्यकीय तज्ज्ञ. नामांकित शल्यचिकित्सक. मात्र त्यापलीकडं जात त्यांच्या व्यक्तित्वाला कैक कंगोरे लाभले आहेत. या साऱ्यांत मॅरेथाॅन हा शब्द त्यांच्यासाठी खास आहे. तोच त्यांचा ध्यास बनला आहे. धावणं हे त्यांच्यासाठी श्वास बनलं आहे. त्यातूनच म- ‘मॅरेथाॅन’चा हे पुस्तक साकारलं गेलं आहे. उल्लेखनीय म्हणजे आजच (28 डिसेंबर) या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वर्षपूर्तीचा दिवस.

म- ‘मॅरेथाॅन’चा मधली डाॅक्टरांची कहाणी विलक्षण प्रेरणादायी आहे. होैशी मॅरेथाॅन धावपटू ते ‘सातारा हिल हाफ मॅरेथाॅन’चा संस्थापक, संयोजक हा टप्पा उलगडणारी आहे. त्यात धावण्यापासून स्पर्धा आयोजनापर्यंतच्या बारीकसारीक बाबींना स्पर्श करण्यात आला आहे. त्यामुळं हे पुस्तक प्रेरणादायी प्रवासाची धाव बनलं आहे.

डाॅक्टरांची लेखनशैली सहजसोपी आहे. धावत्या पावलांसारखी पुढं जाणारी आहे. मॅरेथाॅनच्या अनुषंगानं अथंपासून इथंपर्यंत सारंकाही सांगणारी आहे. अगदी नवख्या वाचकालाही मॅरेथाॅनची गोडी लावणारी आहे.

पुढे वाचा…

सुनील शेडगे

डॅा. संदीप काटेंनी मराठीत मॅरेथॅान विषयी पुस्तक लिहून त्या विषयीच्या ज्ञानाची कवाडं मराठी जनतेला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हार्दीक आभार.

माझ्या व्यक्तीगत जिवनात या पुस्तकाने अगोदरच प्रभाव पाडायला सुरुवात केलेली आहे. तसेच माझ्या वाचन संस्कृतीमधे आदरनीय पु.लं. चा मोठा प्रभाव असल्यामुळे असेल कदाचीत.

पण मला असे वाटले की, आज पुलं च्या हाती हे पुस्तक पडले असते तर काय बोलले असते? पुल म्हणाले असते: “डॅाक्टर काटे बहुदा स्वत्:च्या व्यवसाय बंधुंचा दोष पत्कारतील ;कारण अशा क्रांतीमुळे पेशंटची संख्या घटणार हे नक्की. तसे पाहीले तर गणिताच्या शिक्षकांप्रमाणे माझे व्यायामाशी देखील फारसे सख्य नाही परंतू या पुस्तकामुळे माझे विचार नक्कीच बदलले आहेत व लवकरच तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम अंमलात आणायचा विचार आहे. लो. टिळकांनी जो व्यायामाचा ध्यास धरला होता व पुण्यात ठीकठीकाणी जशा तालमी ऊभ्या राहील्या ,त्याप्रमाणेच ठीकठीकाणी मॅरेथॅानचे मेळावे भरण्यास प्रोत्साहीत करणारे डॅा. काटे आणि त्याचे सहकारी यांचे श्रेय देखील प्रक्रृतीस्वास्थ्यातील तज्ञ ईतिहासात नोंदवतील अशी मला खात्री वाटते. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी साहीत्यविश्वात ‘एक आरोग्यवर्धीनी ‘ भर पडली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही”.

डॉ. विक्रम दबडे

धावल्याने जीवनात धावा धाव करावी लागत नाही हे मला धावण्यामुळे कळाले! त्यामुळे आत्मविश्वासाचे एक बीज शरीरात रोवले जाते. सर्वांगसुंदर असा हा व्यायाम ज्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. हवी  फक्त आवड  व  सवय .निरामय आरोग्याचा हा मूलमंत्र आम्हा सर्वांसाठी  रामबाण उपाय आहे.

सुंदर प्रफुल्ल पहाट रस्ते आणि कडेची झाडे, झुडपे, वेली, प्राचीच्या आभाळावर शिंपडलेला  सुरेख रंगांचा सडा बघून धावायला स्फूर्ती मिळते. एका वेगळ्या आत्म विश्वात आपण वावरतो . सोबतीला साथीदार असले म्हणजे समाधान काय वर्णावे!

आमच्या पूर्वजांनी “चरैवती चरैवती” म्हणजे चालत रहा असे आम्हास सांगून ठेवले आहे. पळणे म्हणजे, चालण्याच्या  एक पाऊल पुढे आम्ही टाकले आहे, प्रातःकाली वा संध्यासमयी जसे जमेल तसे शिस्तीत नियमित धावणे ही आपली जीवनशैली व्हावी हा बोध डॉक्टर काटे यांच्या ‘ म मॅरेथॉनचा ” या  देखण्या वाचनीय स्वानुभवावर आधारित सुरेख पुस्तकावरून मिळतो. प्रत्येकाच्या संग्रही  असावे असे हे पुस्तक आहे.

विचाराच्या एक एक धाग्याने हे सुंदर  महावस्त्र विणले गेले. म -” मॅरेथॉन ” चा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संदीप काटे यांचे मनःपूर्वक अभिनन्दन!

डॉ. अपर्णा पाटील

मॅरेथॉनबद्दल आकर्षण आणि कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाला मॅरेथॉन पळायला लावणारे लेखन…

संपूर्ण पुस्तक अनेक प्रकारणांमध्ये एका वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण प्रकारे विभागले आहे… त्यामुळे कोणत्याही प्रकारणापासून वाचले तरी चालते आणि त्याची वेगळीच मजा येते…

मॅरेथॉन उपक्रम साताऱ्यात सुरू करून साताऱ्याचे नाव मॅरेथॉनच्या विश्वाच्या नकाशावर कोरण्याच्या, डॉक्टर आणि सर्व टीमच्या कामाला सलाम…

Jaideep Deshmukh

खरं तर सर या पुस्तकाच्या माध्यमातूनच तुमची ओळख झाली. प्रत्येक वाचकाची आवडती गोष्ट म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना जी डॉ. नामदेव सरांनी एकदम अचूक शब्दांत पुस्तकास साजेल अशी मांडलीय. आणि “पाया” पासुन ते कळसापर्यंत चे प्रत्यक्ष खडतर अनुभव घेऊन तुम्ही केलेलं लेखन, सातारा मॅरेथॉन चालू करेपर्यंत चा प्रवास खूपच अप्रतिम आहे.

‘म’ मूळव्याध पासुन ‘म’ मॅरेथॉन ची वाटचाल खरोखरच लाजवाब आहे सर.

हे पुस्तक फक्त धावकासाठीच न्हवं तर जे नकारात्मक विचाराने खचुन गेलेत, स्वतःच स्वतःला कमजोर समजू लागलेत त्या प्रत्येकासाठी एक नवी आशेची किरण दाखवणारे आहे आणि धावकास तर वाळवंटात सापडलेले मृगजळ आहे या पुस्तकामुळे जे काहीच करत न्हवते ते हळूहळू चालू लागले, चालणारे धावू लागले, धावणाऱ्यांच्यात नियमितता आणि गती आली.

माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या #आईने सुद्धा हे पुस्तक वाचले. #हेपुस्तकजेवाचतीलतेशंभरटक्के_धावतील

पुन्हा एकदा सर तुमचे विशेष अभिनंदन🎊💝

‘म’ मॅरेथॉन चा सुंदर आहे मज्जाच मज्जा…

लेखक तर खूपच सुंदर आहेत मज्जाच मज्जा…

राहुल जगदाळे

नमस्कार, खुप दिवसांनी म मॅरेथॉनचा हा सलग पुस्तक वाचनाचा आनंद घेत आहे. लेखक म्हणून सुद्धा आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. मनापासून अभिनंदन.

पुस्तक वाचून आजपर्यंत मॅरेथॉन मध्ये भाग न घेणारा परन्तु आपणही आता सराव करून उतरावे ही इच्छा वाढीला लागली व सराव प्रयत्न सुरू झाले. जास्तीत जास्त जणांच्या समोर हे पुस्तक जावे ही मनोमन इच्छा आहे.

तसेच इतर काही भाषेत अनुवाद करता येईल का तसेच अधिक ठिकाणी प्रकाशने करता येतील का जेणेकरून अधिक लोकांना या पुस्तका बद्धल माहिती अधिक होऊ शकेल.

सर्वच बाबतीत हे पुस्तक उजवे झाले आहे, जशी की भाषा, वापरलेला फॉन्ट त्याची साईज , QR कोड, समृद्ध अनुभव, वाचकांना जास्तीत जास्त माहिती पोहचविण्याची पॅशन इत्यादी.

मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.

अभय नांगरे

घरी आल्या आल्या पुस्तक उघडून काही चॅप्टर वाचायला सुरुवात केली..

एक अतिशय चांगली आणि आवडलेली बाब म्हणजे हे पुस्तक पहिल्या पानापासून सुरू केलं पाहिजे असं बंधन नाही. वेगवगळ्या विषयांवर माहिती असल्यामुळे कुठल्याही क्रमाने वाचले तरी उत्कंठा तशीच राहते.

अनेक मुद्दे एक धावक म्हणून स्वतः अनुभवले असल्यामुळे जवळचे वाटतात. अत्यंत सोप्या शब्दात आणि खूप technicality मध्ये ना जाता सुद्धा सर्व मुद्दे शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखले आहेत. उदा. शूज कोणते घालावेत यावरचा चॅप्टर.

अतिशय सुंदर, संग्राह्य आणि सर्व नवोदित धावपटूंसाठी आणि न धावणाऱ्या लोकांचा सुद्धा धावण्या विषयीचा बाऊ दूर करणारे एक उपयुक्त पुस्तक.

संदीप कुलकर्णी

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या आयुष्यातील पहिली मॅरेथॉन (सातारा हिल हाफ मॅरेथॉन) ज्याच्यामुळे धावण्याची संधी मिळाली असे आदरणीय संदिप काटे सरांच्या ” म मॅरेथॉनचा ” पुस्तक वाचनाचा योग आला.

पुस्तकाच्या पानोपानी शब्द सुमनांच्या फुलोऱ्यातुन दरवळणारा सुगंध मंत्र मुग्ध करत समाधी अवस्थेतून पुन्हा एकदा सातारा हिल मॅरेथॉन धावतांना यवतेश्वराचा घाट संपल्यावर सातारकरांची रस्ताच्या
दुतर्फा धावपटूची ऊस्ताह वाढवणारी गर्दी, त्या गर्दीतील एका ८ -१० वर्षाच्या मुलाने हातावर दिलेली टाळी, त्यातुन चढलेले नवचैतन्य , मॅरेथॉन फिनीश लाईनवर पायात आलेला गोळा (क्रॅम्प) , कॅज्युअलटी विभागात घेतलेला पाहुणचार, आणि अगदी थोड्याच वेळात आदरणीय श्री नामदेवजी भोसले सरांच्या संगतीने केलेली धमाल, सातारा सोडताना यथेच्छ मटन भाकरीवर दिलेला ताव, या आणि अशा अनेक आठवणींचा उजाळा पुस्तक वाचताना प्रकर्षांने जाणवत राहतो.

मराठी भाषेतून पहिल्यांदा मॅरेथॉन या विषयावर सखोल ऊहापोह असलेले पुस्तक लिहल्याबद्दल संदीपजी काटे सरांचे मनापासून आभार मानतांना
एक गोष्ट प्रकर्षाने नमुद करावीशी वाटते की आमच्या सारख्या नवीन शहरी/ग्रामीण (non metropolitan city) धावपटूना जी एका मार्गदर्शकाची (कोच) उणिवा नेहमीच भासते, ती ऊणिव भरून काढण्याचे काम पुस्तक रूपाने भविष्यात होत राहिल या बद्दल शंकाच नाही.

आपल्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा.

अविनाश पाटील

संदीप मित्रा ,
You are really GREAT !

आताच म – मॅराथॉनचा तुझं पुस्तक वाचून झालं, प्रथमतः अतिशय सुंदर असं मॅरेथॉनचे पहिले मराठीत पुस्तक लिहल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन.

मी तुला गेली आठ वर्ष ओळखतो. तू जे काही करतोच ते अतिशय वेगळं , सुंदर, सगळ्याचा उपयोगाचं करतोस. हे पुस्तक सुद्धा त्याचाच जिवंत उदाहरण आहे.

एखादी गोष्ट माणूस किती passionately करू शकतो हे तुझ्या कडून शिकावं. मग ते तुझं running वेड असो , सातारा हिल मॅरेथॉन असो, मॅरेथॉन ची पूर्व तयारी असो, कॉमिक किंवा भोवऱ्याचं collection असो,  खेळ मातीतले असो, सगळं काही अप्रतिम !!!

आपली सगळी मेडिकलची प्रॅक्टिस , फॅमिली life संभाळुन एवढं सगळ्या great गोष्टी तू अगदी निःस्वार्थी मनाने करणं म्हणजे खरंच खायचे काम नाही . यातील एक टक्का जरी मला जमलं तर मला धन्य वाटेल,

ह्या रविवारी सातारला आलो होतो तेव्हा निरंजनेने तुझे पुस्तक हातात दिले . तीन दिवसातच वाचून पूर्ण झाले. वाचताना खुप mazza आली. हे नुसते साधे पुस्तक नाही तर मॅरेथॉन विषयीचा encyclopedia आहे.  यातील भाषा खूप सोपी आहे, मांडणी, अक्षराचा font खूप सुंदर आहे. मराठी बाराखडीची जी कल्पना वापरली आहे ती खुपचं नाविन्यपूर्ण आहे. Running च्या सर्व गोष्टी तू न चुकता समाविष्ट केल्या आहेस त्याबद्दल तु घेतलेल्या परिश्रमांना जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच पडेल.

या पुस्तकाच्या विक्रीतून येणारी रक्कम तू दीपस्तंभ फौंडेशनच्या मनोबल प्रक्लपला देणार हे वाचून तर तुझ्या विषयीचं माझ्या मनातील स्थान खूप उंचावर पोचलंय. आयुष्यभर हे पुस्तक माझ्या संग्रही राहील यात काही शंकाच नाहीं.

पुन्हा एकदा तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन.

डॉ. सोमनाथ मल्लकमिर

राखी धन्यवाद! तू हे पुस्तक माझ्यापर्यंत पोहचवले . खूप खूप आभारी. आताच म marathon cha पुस्तक वाचून संपवलं.

खूप सोप्या भाषेत लेखन केले आहे डॉक्टर संदीप काटे यांनी. मनाला खूप भावले कारण बऱ्याच वेळा असे वाटले की ते माझ्या मनातील विचार व्यक्त करत आहेत.


प्रत्येक भाग एक छोटी सी कथाच वाटते. न धावणारे सुद्धा या पुस्तकात गुंतून जातील या काही शंकाच नाही. आजपर्यंत मला जर काही अडचण आली तर मी खूप जणांना विचारात असे पण काही correct माहिती मिळत नव्हती. माझ्या खूप साऱ्या शंकाच निवारण झाले.

हे पुस्तक वाचून धावपटू बनणे खूप सोपं जाणार आहे धावपटू नसलेल्या व्यक्तिला.

Life is beautiful majjach majja

Bala Rokade

जबरदस्त डॉ. काटे गुरुजी….. पळवणारे बाबा… पुस्तकातला शब्दन शब्द वाचताना तुमच्या सोबतच धावतोय की काय असं वाटतं. प्रत्येक शब्दात धावण्याची प्रेरणा मिळते.

तुमच्या आजवरच्या धावण्याच्या अनुभवातून हे पुस्तक साकार झाले आहे. पुस्तकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जणू चालणाऱ्याला धावायला आणि धावणाऱ्याला आणखी धावायला मदत करतय.

ज्यांनी हे पुस्तक वाचले अशा कितीतरी लोकांनी स्वतःहून धावायला सुरुवात केली असावी. आणि हेच आपल्या पुस्तकाच यश आहे… गुरुजी तुमचा अनुभव वाचताना अंगावर जणू शहारे येतात.. धावतानाचा नाद त्याचा शृंगार, लय कस पकडायचे हे अगदी सोप्या भाषेत तुम्ही आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून साकार केल आहे.

आमच्यासारख्या नवतरुणांना भरारी घेण्याचं आणि पंखांना बळ देण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून झालंय…

खरंच पुस्तक वाचताना फक्त स्वतः तुमच्यासोबत धावतानाचा फील घेतोय असं वाटत होतं…

लई भारी.. गुरुजी… 😍😍 तसेच डॉक्टर नामदेव भोसले Namdeo Bhosale सरांची प्रस्तावना यामुळे एक वेगळच वलय प्राप्त होतं.. एकूणच या पुस्तकात एक शरीरशुद्धीचा मार्ग सोप्या पद्धतीने मांडलाय.

लाईफ इज ब्युटीफुल मजाच मजा❤🌱

अजय दडस

गुड मॉर्निंग सर

सर मी आपलं पुस्तक जस्ट आत्ताच या 2021 मॅरेथॉन च्या अगोदर तीन दिवस खरेदी केलं होतं आणि दीड दिवसात पुस्तक वाचून पूर्ण केले आणि मग मॅरेथॉन पळालो आणि दोन तास आठ मिनिटात पहिल्या प्रयत्नात पूर्ण केली खूप बरं वाटलं.

तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना फिजिकल फिटनेस ट्रेनिंग या विषयी जागरूकता निर्माण होत आहे.

पुस्तक खूप छान लिहिलेले पुस्तक मध्ये जे वर्णन केलेल्या शब्दसंरचना खूप छान आहे. पुस्तक मी पाहिलं तेव्हाच वाचलं. अभिनंदन सर 💐💐 सामान्य माणसाला जागृतता निर्माण करणारं पुस्तक दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏🙏

दत्ता नवघणे