म मॅरेथॉन चा म मॅरेथॉन चा
म - 'मॅरेथॉन' चा
लेखक : डॉ. संदीप सूर्यकांत काटे
प्रकाशक : दीपस्तंभ प्रकाशन
मॅरेथॉन विषयावरील मराठी भाषेतील "म मॅरेथॉन चा" (M for Marathon) हे जगातील पहिलेच पुस्तक आहे. मॅरेथॉन धावपटू असो अथवा मॅरेथॉन आयोजक, दोन्हींसाठी हे एका उत्तम मार्गदर्शकाचे काम करते.
मुंबईतील पोलिस लायनीत लहानाचा मोठा झालेला एक लाजरा बुजरा 'चसमिस' मुलगा पुढे जाऊन प्रथितयश सर्जन व प्रसिद्ध मूळव्याधी तज्ञ झाला. वयाच्या पस्तिशीत योगायोगाने त्याच्या आयुष्यात 'मॅरेथॉन' आली. स्वतः मॅरेथॉनमध्ये पळताना आपल्याही गावात मॅरेथॉन भरवायची अशी सहज मनात आलेली कल्पना मित्रांच्या साथीने वास्तवात उतरवली आणि त्यातून जगप्रसिद्ध ' सातारा हिल हाफ मॅरेथॉन 'चा जन्म झाला.
'म - मूळव्याधी' तून 'म - मॅरेथॉन' कडे झालेल्या या भन्नाट प्रवासात कालांतराने 'म - मातीतल्या खेळांच्या' रूपाने आणखी एक नवा अध्याय आला. आता 'म - मनोबल' परिवाराशी जोडल्या गेलेल्या डॉ. संदीप सूर्यकांत काटे यांच्या आयुष्याची ही काहीशी आश्चर्यकारक कहाणी तुम्हालाही तुमच्या जीवनात काहीतरी तुफानी करण्याची प्रेरणा देईल, नवी उमेद देईल अशी आशाच नव्हे तर खात्री वाटते!
यजुवेंद्र महाजन,
दीपस्तंभ - मनोबल फाऊंडेशन
ठळक वैशिष्ट्ये.
सुंदर स्केचेस आणि लेखनाची अनोखी पद्धत, यासह अष्टपैलू मार्गदर्शक असण्यापलीकडे डॉ. संदीप यांनी हे पुस्तक वाचायला मनोरंजक बनवण्याचाही यशस्वी प्रयत्न केला आहे. काही ठळक वैशिष्ट्ये इथे नमूद केली आहेत.
पहिले पुस्तक
"म - मॅरेथॉन चा" हे मॅरेथॉनिंग आणि रनिंग या विषयावरील मराठी भाषेतील पहिले पुस्तक आहे.
सर्वांसाठी मार्गदर्शक
मॅरेथॉन बाबतच्या मूलभूत व प्रगत अशा दोन्ही प्रकारच्या संकल्पना सर्व धावपटूंसाठी सोप्या भाषेत व मनोरंजक शैलीत मांडल्या आहेत.
संवादशैली
पुस्तकाची संवादशैली वाचून डॉ. संदीप तुमच्याशी गप्पांच्या माध्यमातून जीवन प्रवास उलगडून सांगत आहेत, असेच जाणवते.
सुंदर कलाकृती
लेखकाच्या अनुभवातील अनेक प्रसंग तसेच वेगवेगळ्या संकल्पना दर्शवण्यासाठी पुस्तकात ठिकठिकाणी सुंदर स्केचेसचा वापर करण्यात आला आहे (कलाकार : अमित आर्टिस्ट)
क्यू-आर कोड
या पुस्तकात ठिकठिकाणी काही उपयुक्त व मनोरंजक माहिती देण्याकरिता संबंधित संकेतस्थळ अथवा विडिओ इत्यादींचे लिंक्स असलेले QR कोड दिलेले आहेत.
योगदान
या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या 'मनोबल' प्रकल्पाला जाते, जे अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या मोफत उच्च शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
३८०+
उत्तम दर्जाची पाने
६०+
सुंदर कलाकृती
भाषाशैली
%
सर्जनशीलता
%
संपादन
%
धावपटू
ट्रेनिंग
SHHM
किलोमीटर
चालणं
ऊर्जा
मेडल
स्पीड
घाट
सातारा
एक्स्पो
बिब
डिहायड्रेशन
अंतिम रेषा
कुटुंब
टीम
मॅरेथॉन
मातीतले खेळ
पेसर
स्वयंसेवक
राजकारण
मनोबल प्रकल्प
अपंग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यासाठी कार्यरत.
मनोबल ही अपंग व्यक्ती, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली निवासी संस्था आहे, जी या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी देखील मदत करते आणि प्रवेशयोग्य आणि सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. दीपस्तंभ फौंडेशन च्या “मनोबल” या प्रकल्पाद्वारे या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात.
“म – मॅरेथॉन चा” या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनच्या या ‘मनोबल’ प्रकल्पाला जाते.
वाचकांच्या प्रतिक्रिया
"म - मॅरेथॉन चा" च्या सर्व वाचकांचे मौल्यवान अभिप्राय आणि प्रतिक्रिया शेअर केल्याबद्दल मनापासून आभार. या पुस्तकाच्या विक्रीतून विक्रीतून मिळालेली १००% रक्कम दान करण्यात आली आहे.
डॅा. संदीप काटेंनी मराठीत मॅरेथॅान विषयी पुस्तक लिहून त्या विषयीच्या ज्ञानाची कवाडं मराठी जनतेला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे हार्दीक आभार.
माझ्या व्यक्तीगत जिवनात या पुस्तकाने अगोदरच प्रभाव पाडायला सुरुवात केलेली आहे. तसेच माझ्या वाचन संस्कृतीमधे आदरनीय पु.लं. चा मोठा प्रभाव असल्यामुळे असेल कदाचीत.
पण मला असे वाटले की, आज पुलं च्या हाती हे पुस्तक पडले असते तर काय बोलले असते? पुल म्हणाले असते: "डॅाक्टर काटे बहुदा स्वत्:च्या व्यवसाय बंधुंचा दोष पत्कारतील ;कारण अशा क्रांतीमुळे पेशंटची संख्या घटणार हे नक्की. तसे पाहीले तर गणिताच्या शिक्षकांप्रमाणे माझे व्यायामाशी देखील फारसे सख्य नाही परंतू या पुस्तकामुळे माझे विचार नक्कीच बदलले आहेत व लवकरच तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम अंमलात आणायचा विचार आहे. लो. टिळकांनी जो व्यायामाचा ध्यास धरला होता व पुण्यात ठीकठीकाणी जशा तालमी ऊभ्या राहील्या ,त्याप्रमाणेच ठीकठीकाणी मॅरेथॅानचे मेळावे भरण्यास प्रोत्साहीत करणारे डॅा. काटे आणि त्याचे सहकारी यांचे श्रेय देखील प्रक्रृतीस्वास्थ्यातील तज्ञ ईतिहासात नोंदवतील अशी मला खात्री वाटते. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी साहीत्यविश्वात ‘एक आरोग्यवर्धीनी ‘ भर पडली असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही".
डॉ विक्रम दबडे
धावल्याने जीवनात धावा धाव करावी लागत नाही हे मला धावण्यामुळे कळाले! त्यामुळे आत्मविश्वासाचे एक बीज शरीरात रोवले जाते. सर्वांगसुंदर असा हा व्यायाम ज्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही. हवी फक्त आवड व सवय .निरामय आरोग्याचा हा मूलमंत्र आम्हा सर्वांसाठी रामबाण उपाय आहे.
सुंदर प्रफुल्ल पहाट रस्ते आणि कडेची झाडे, झुडपे, वेली, प्राचीच्या आभाळावर शिंपडलेला सुरेख रंगांचा सडा बघून धावायला स्फूर्ती मिळते. एका वेगळ्या आत्म विश्वात आपण वावरतो . सोबतीला साथीदार असले म्हणजे समाधान काय वर्णावे!
आमच्या पूर्वजांनी "चरैवती चरैवती" म्हणजे चालत रहा असे आम्हास सांगून ठेवले आहे. पळणे म्हणजे, चालण्याच्या एक पाऊल पुढे आम्ही टाकले आहे, प्रातःकाली वा संध्यासमयी जसे जमेल तसे शिस्तीत नियमित धावणे ही आपली जीवनशैली व्हावी हा बोध डॉक्टर काटे यांच्या ' म मॅरेथॉनचा '' या देखण्या वाचनीय स्वानुभवावर आधारित सुरेख पुस्तकावरून मिळतो. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.
विचाराच्या एक एक धाग्याने हे सुंदर महावस्त्र विणले गेले. म -" मॅरेथॉन " चा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संदीप काटे यांचे मनःपूर्वक अभिनन्दन!
डॉ अपर्णा पाटील
नमस्कार, खुप दिवसांनी म मॅरेथॉनचा हा सलग पुस्तक वाचनाचा आनंद घेत आहे.
लेखक म्हणून सुद्धा आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. मनापासून अभिनंदन.
पुस्तक वाचून आजपर्यंत मॅरेथॉन मध्ये भाग न घेणारा परन्तु आपणही आता सराव करून उतरावे ही इच्छा वाढीला लागली व सराव प्रयत्न सुरू झाले. जास्तीत जास्त जणांच्या समोर हे पुस्तक जावे ही मनोमन इच्छा आहे.
तसेच इतर काही भाषेत अनुवाद करता येईल का तसेच अधिक ठिकाणी प्रकाशने करता येतील का जेणेकरून अधिक लोकांना या पुस्तका बद्धल माहिती अधिक होऊ शकेल.
सर्वच बाबतीत हे पुस्तक उजवे झाले आहे, जशी की भाषा, वापरलेला फॉन्ट त्याची साईज , QR कोड, समृद्ध अनुभव, वाचकांना जास्तीत जास्त माहिती पोहचविण्याची पॅशन इत्यादी.
मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.
अभय नांगरे
“घरी आल्या आल्या पुस्तक उघडून काही चॅप्टर वाचायला सुरुवात केली..
एक अतिशय चांगली आणि आवडलेली बाब म्हणजे हे पुस्तक पहिल्या पानापासून सुरू केलं पाहिजे असं बंधन नाही. वेगवगळ्या विषयांवर माहिती असल्यामुळे कुठल्याही क्रमाने वाचले तरी उत्कंठा तशीच राहते.
अनेक मुद्दे एक धावक म्हणून स्वतः अनुभवले असल्यामुळे जवळचे वाटतात. अत्यंत सोप्या शब्दात आणि खूप technicality मध्ये ना जाता सुद्धा सर्व मुद्दे शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखले आहेत. उदा. शूज कोणते घालावेत यावरचा चॅप्टर.
अतिशय सुंदर, संग्राह्य आणि सर्व नवोदित धावपटूंसाठी आणि न धावणाऱ्या लोकांचा सुद्धा धावण्या विषयीचा बाऊ दूर करणारे एक उपयुक्त पुस्तक.”